Ad will apear here
Next
दगडूशेठ गणपती शहाळ्यांमध्ये विराजमान
पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त पाच हजार शहाळ्यांचा नैवेद्य
दगडूशेठ गणपती मंदिरात शहाळे महोत्सवानिमित्त गणरायाला तब्बल पाच हजार शहाळ्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला.

पुणे : ‘वैशाखवणव्यापासून तमाम भारतीयांचे रक्षण व्हावे, दुष्काळ सहन करण्याची ताकद मिळावी, शेतकऱ्यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने निर्विघ्नपणे सुटाव्यात,’ असे साकडे पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त दगडूशेठ गणपतीला घालण्यात आले. त्या निमित्ताने १८ मे रोजी दगडूशेठ मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी पाच हजार शहाळ्यांच्या साह्याने केलेल्या मखरात गणपतीबाप्पा विराजमान झाले होते. 

श्री गणेशाचे विविध अवतार पाताळ, पृथ्वी व स्वर्गलोकात झाल्याचे उल्लेख पुराणात सापडतात. त्यापैकी एक म्हणजे पुष्टिपती विनायक अवतार. या पुष्टिपती विनायकाच्या जयंतीनिमित्त शहाळे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. नारळाची प्रतीकात्मक झाडे आणि शहाळ्यांनी सजविलेला मंदिराचा परिसर पाहण्याकरिता पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती.

पं. शौनक अभिषेकी
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे हा शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला होता. अक्कलकोटचे अॅड. रवींद्र खैराटकर यांनी गणपतीबाप्पाला तब्बल पाच हजार शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण केला. ही शहाळी नंतर ससून रुग्णालयातील रुग्णांना देण्यात येणार आहेत.
राजेशकुमार सांकला यांच्या हस्ते गणेश पूजा झाली. या वेळी ट्रस्टचे विश्वस्त व कार्यकर्ते उपस्थित होते. १८ मे  रोजी सूर्योदयाच्या वेळी गणेशजन्म सोहळा पार पडला. त्यापूर्वी पहाटे पं. शौनक अभिषेकी यांनी स्वराभिषेकाच्या माध्यमातून गायनसेवा अर्पण केली. त्या वेळी मंदिरामध्ये गणेशयाग आणि सत्यविनायक पूजादेखील करण्यात आली. 

दुर्मती राक्षसाच्या वधासाठी शिव-पार्वतीच्या घरी वैशाख पौर्णिमेच्या शुभदिनी श्री गणरायाने घेतलेला अवतार म्हणजे पुष्टिपती अवतार होय. श्रीगणेश पुराण व मुद्गल पुराण या ग्रंथांमध्ये याचा संदर्भ आढळतो. या अवतारामध्ये पुष्टी ही भगवान विष्णूंच्या घरी त्याची मुलगी म्हणून जन्म घेते व श्री गणेश हे विनायक स्वरूपात शंकर-पार्वती यांच्या घरी जन्म घेतात. त्यामुळे वैशाख पौर्णिमेचा दिवस हा पुष्टिपती विनायक जयंती म्हणून साजरा केला जातो. उत्तर भारतामध्ये बैसाखी हा सण याच दिवशी साजरा केला जातो. 


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZSBCA
Similar Posts
सूर्यमंदिरात विराजमान होणार दगडूशेठ गणपती पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने ट्रस्टच्या १२७व्या वर्षानिमित्त गणेशोत्सवात ओडिशा राज्यातील जगप्रसिद्ध कोणार्कचे सूर्यमंदिर साकारण्यात येणार आहे. यंदाची संकल्पना भारताच्या प्राचीन वेद, पुराणे, शास्त्रे यांवर आधारित आहे. त्यामुळे या गणेशोत्सवात दगडूशेठ
दगडूशेठ गणपतीला ११ हजार विविधरंगी फळांचा महानैवेद्य पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे दगडूशेठ गणपतीला केळी, डाळींब, आंबे, पेर, चिक्कू, अंजीर ,अननस, फणस, द्राक्षे, संत्री, मोसंबी, टरबूज, लिची अशा तब्बल ११ हजार विविधरंगी फळांचा महानैवेद्य दाखविण्यात आला.
अंगारक चतुर्थीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात आकर्षक सजावट पुणे : अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंदिर फुलांनी सजवण्यात आले असून, अत्यंत आकर्षक अशी ही सजावट डोळ्याचे पारणे फेडत आहे. पहाटेपासूनच भाविकांनी गणरायाच्या दर्शनासाठी येथे गर्दी केली आहे.
‘रुबी हॉल क्लिनिक’तर्फे भाविकांसाठी वैद्यकीय मदत केंद्र पुणे : ‘रुबी हॉल क्लिनिक’तर्फे गणेशोत्सवाच्या काळात भाविकांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी या उद्देशाने दगडूशेठ गणपतीजवळ वैद्यकीय मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात येत असून, येथे भाविकांची वैद्यकीय तपासणीही करण्यात येत आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language